यावल प्रतिनिधी । येथील नगर परिषदच्या माध्यमातून १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीतुन शहरातील चक्रधर नगरात वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते यांच्यासह नगर परिषदेचे शिवानंद कानडे , नगर परिषदचे कनिष्ठ अभीयंता अमोल मदने, रमाकांत मोरे यांच्यासह आदी मान्यवर मंडळी याप्रसंगी उपस्थित होती . आज दिनांक ३१ जानेवारीस याच कार्यक्रमाअंतर्गत विस्तारीत वसाहतीतील कार्यक्षेत्रातील आयशा नगर या ठीकाणी नगर परिषदच्या माध्यमातुन विविध वृक्षांची लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले.
यावल नगर परिषदच्या वतीने शहरात विविध ठीकाणी १४ व्या वित्तीय आयोगाच्या निधीतुन वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविण्यात येत असुन , आज ३१ जानेवारी रोजी शहरातील विस्तारीत भागातील आयशा नगर कॉलनी आणी विविध ठीकाणी रस्त्याच्या कडेला विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली याप्रसंगी नगर परिषदचे कनिष्ठ अभीयंता अमोल मदने, वसंत कुमार , सामाजीक कार्यकर्ते अशफाक शाह , हाफीज खान , इसरार खान,नुरोद्दीन शेख , सुलेमान सर , रईस खान सर यांच्यासह या परिसरातील युवक मोठया संख्येने उपस्थित होते.