चोपडा येथे संविधान दिनानिमित्ताने विविध स्पर्धा

WhatsApp Image 2019 11 28 at 18.57.40

चोपडा, प्रतिनिधी | शहरातील आंबेडकर नगर( पाटीलगढी खाई) जयभिम मित्र मंडळ,आंबेडकरवादी गृप यांनी २६ नोव्हेबर संविधान दिवस व २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर जो हल्ला करण्यात आला त्यात पोलिस अधिकारी ,कर्मचारी व नागरीक मृत्यूमुखी पडले होते अश्या सर्वाना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.

संविधान दिन व शहीद दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बहुजन समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय अहिरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्तावना अमन वाडे यांनी केले. या ठिकाणी गल्लीतील शाळकरी मुलांनी संविधान या विषयावर भाषण दिले. तसेच संविधान प्रस्तविकाचे वाचन केले .उत्कृष्ट भाषणाबद्दल मुलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाचे फोटो, संविधान पुजन,व शहीद जवान या सर्वाना फुले अर्पण करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख उत्तम चव्हाण, माजी नगरसेविका सुभद्राताई वाडे, संजय सांळुखे, बहुजन समाज पक्षाचे अनिल वाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला वाड्यातील सर्व बौध्द उपासक,उपासिका हजर होते. सुत्रसंचालन राजदिप संजू साळूखे यांनी तर आभार रोहित वाडे यांनी मानले.

Protected Content