यावल प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा समाज विद्या प्रसारक मंडळाव्दारे संचालित सहकारी समाजाचे यावल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम अंतर्गत विविध वृक्षाचे रोपण करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, यावल वन विभागाचे अधिकारी ए. एम. खान (वनपाल फैजपूर क्षेत्र), आर. पी. तायडे (वनपाल डोंगर कठोरा), आर.एस. शिंदे (वनपाल वाघझिरा क्षेत्र) आणि आर. एम. तडवी (वनपाल मोहमांडली) यांच्या उपस्थितीत हस्ते रोपण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व कार्यक्रमास उपस्थितांना आपल्या मार्गदर्शनातुन पटवुन दिलेत. यावेळी महाविद्यालय परिसरात विविध औषद्य वनस्पतीच्या मोल्यवान अशा चिंच, आवळा, निम, पिंपळ, वड हे दिर्घायुष्यी व उपयोगी वृक्ष लावण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए.पी.पाटील, प्रा. एम.डी.खैरनार, प्रा. संजय पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.डी.पवार, डॉ.एच.जी. भंगाळे, डॉ. सुधा खराटे, डॉ. एस. पी. कापडे, प्रा. एस. आर. गायकवाड, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. मनोज पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वयंसेवक याज्ञनिका जावळे, विश्वदेवी भालेराव, युक्ती चौधरी, हिमांशू नेवे, रवींद्र तायडे यांनी आपले बहुमोल्य योगदान व सहकार्य केले.