विद्यापीठात प्रवर्तन व विद्यार्थी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेत आयोजित प्रवर्तन व विद्यार्थी मार्गदर्शन सत्रात अधिष्ठाता प्रा.अनिल डोंगरे व ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक विजय आहेर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी प्रशाळेच्या संचालिका प्रा.मधुलिका सोनवणे उपस्थित होत्या. यावेळी प्रा.डोंगरे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करतांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांना वाव द्यावा तसेच आत्मविश्वासाने वाटचाल करावी.

या कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी ६ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रभारी संचालक विजय आहेर यांनी ग्रंथालय पध्दती, नियम, पुस्तक शोधन इत्यादी बाबत माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी अध्यक्षस्थानी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.पवित्रा पाटील, डॉ.अतुल बारेकर, प्रा.रमेश सरदार, डॉ.आर.आर.चव्हाण, श्री.हर्षल नेरकर, श्री.सागर वखारे उपस्थित होते. या कार्यक्रमात एमबीए व बीएमएसचे विद्यार्थी सहभागी होते.

Protected Content