जळगावातून हद्दपार असलेल्या आरोपीस शहरातून अटक

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातून एक वर्षासाठी हद्दपार असलेल्या आरोपीस शहर पोलीसांनी बसस्थानकापासून अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात हद्दपारीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. 

अधिक माहिती अशी की, आरोपी गुड्डू उर्फ नईम भिस्ती (वय-२८) रा. जळगाव याच्यावर विविध कलमान्वये शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशान्वये जळगाव शहरातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. दरम्यान आरोपी गुड्डू भिस्ती हा वर्षभराकरीता हद्दपार असतांना शहरात असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली. आरोपी हा शहरातील नवीन बसस्थानकाजवळ असल्याची शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळाल्यानंतर त्यांनी पो.ना. भास्कर ठाकरे, पोहेकॉ किशोर निकुंभ, अक्रम शेख, गणेश शिरसाळे, पो.कॉ. सुधीर साळवे, रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांनी कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. हद्दपारीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content