तेहरानजवळ विमान कोसळले ; 180 प्रवाशी ठार

images

 

तेहरान (वृत्तसंस्था) इराणची राजधानी तेहरानमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. तेहरानवरुन उड्डाण केलेले एक यूक्रेनिअन एअरलाइन्सचे विमान कोसळले. या विमानात 180 प्रवासी प्रवास करत होते. या अपघात सर्व प्रवासी ठार झाल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये प्रचंड तणाव तयार झालेला असताना हा अपघात झाला आहे.

 

अपघातग्रस्त विमान यूक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्सचे असून PS752 B737 असा या विमानाचा नंबर आहे. अल हदथ या स्थानिक न्‍यूज एजन्सीने रॉकेटविरोधी गनकडून चुकीने पाडल्याचा दावा केला आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचेही बोलले जात आहे. अपघातग्रस्त विमान हे युक्रेनची राजधानी कीव येथे जात होते. विमानात १८० प्रवासी आणि क्रू होता. बचाव कार्य सुरू करण्यात आले. या भीषण अपघातात एकही प्रवासी बचावला नाही. इराण आणि अमेरिकेमध्ये प्रचंड तणाव तयार झालेला असताना हा अपघात झाला आहे.

Protected Content