इराकमधील अमेरिकन तळांवर इराणचा हल्ला

missile

बगदाद वृत्तसंस्था । इराकमधील अमेरिकेच्या तीन लष्करी तळावर आज पहाटे इराणने क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याने मध्यपूर्वेतील वातावरण चिघळले आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेने इराणचे लष्करी अधिकारी सुलेमानी यांना ठार केल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. कालच सुलेमानी यांचे अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर रात्री उशीरा इराणने इराकमध्ये असणार्‍या अमेरिकेच्या तीन लष्करी तळावर हल्ला केला आहे. इराणणे लष्करी तळाच्या दिशेने बारा बॅलेस्टीक मिसाईल्स डागले असून यामुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

इराणच्या इस्लामीक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने अमेरिकेन लष्करी तळांवर हल्ला केल्याचे वृत्त तेहरानमधील सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे. तर इराणचे विदेशमंत्री जावेद झरीफ यांनी आपल्या देशाने स्वसंरक्षणाई कारवाई केल्याचे सांगितले आहे. तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांनी ट्विट करून इराणने केलेल्या हल्ल्याच्या नुकसानीची माहिती घेतली जात आहे. अमेरिकेचे सैन्य हे जगात शक्तीशाली असून या हल्ल्याबाबत आपण उद्या अधिकृत प्रतिक्रिया देणार असल्याचेही त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, इराणच्या या हल्ल्यामुळे मध्यपूर्वेतील वातावरण चिघळल्याचे दिसून येत आहे.

Protected Content