राज्यात २३ नवे रूग्ण; एकुण आकडा ८९१ वर पोहचला

मुंबई वृत्तसंस्था । धारावीत आज आणखी दोन नवे रुग्ण आढळून आले असून दोघे एकाच कुटुंबातील आहे. बापलेकांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या ७वर पोहोचली आहे. तर आज राज्यात २३ नवे रुग्ण वाढल्याने राज्यातील रुग्णांची एकूण संख्या ८९१वर गेली आहे.

धारावीच्या बलिगा नगरमध्ये हे दोन रुग्ण आढळले आहेत. एकाच घरातील हे दोघेही रुग्ण आहे. आता हे रूग्ण नवीन आढळून आल्याने ते कोणाकोणाच्या संपर्कात होते याची माहिती आरोग्य प्रशासन करीत आहे. एका ४९ वर्षीय व्यक्तीला आणि त्याच्या ८० वर्षीय वडिलांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या कुटुंबाचं घर सील करण्यात आलं आहे. त्याशिवाय या संपूर्ण बलिगा नगरही सील करण्यात आलं आहे. बलिगानगरमधील करोना रुग्णांची संख्या चारवर पोहोचली असून त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, राज्यात आज पुन्हा २३ रुग्ण आढळल्याने राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ८९१वर पोहोचला असून मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा ५२६वर गेला आहे. आज आढळलेल्या २३ नव्या रुग्णांपैकी मुंबईत १०, पुण्यात ४, नगरमध्ये ३, नागपूर आणि बुलडाण्यात प्रत्येकी दोन व सांगलीत एक रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

Protected Content