जामनेरात ‘गुलाबी गँग’ ! : विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

जामनेर प्रतिनिधी । जामनेरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नगरपालिके  विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी ‘गुलाबी गँग’ वर सोपवीली आहे. बचत गटांच्या महिलांना गुलाबी रंगाच्या साड्या ड्रेसकोड म्हणून देत त्यांना कारवाईचे अधिकार दिले. मंगळवारी या गुलाबी गँगने शहरात विनामास्क वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. 

मंगळवारी विनामास्क फिरणाऱ्यांवर पालिकेच्या गुलाबी गँगच्या महिलांकडून कारवाई करण्यात आली. आढावा बैठकीसाठी आलेल्या प्रांताधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी गुलाबी गँगच्या कारवाईचे कैतूक केले. तर कारवाई करणाऱ्या पथकास धक्काबुक्की केल्याने दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जामनेर तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी शासनाने काही निर्बंध लावले आहेत. मात्र नागरीकांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने रूग्णसंख्या वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जामनेरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नगरपालिके  विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी ‘गुलाबी गँग’ वर सोपवीली आहे. बचत गटांच्या महिलांना गुलाबी रंगाच्या साड्या ड्रेसकोड म्हणून देत त्यांना कारवाईचे अधिकार दिले. मंगळवारी या गुलाबी गँगने शहरात विनामास्क वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांमध्ये गुलाबी गँगची चांगलीच दहशत निर्माण झाली. जामनेरात आलेल्या प्रांताधिकारी तृप्ती धोडमीसे तहसिलदार अरूण शेवाळे यांनी मुख्याधिकारी राहूल पाटील व गुलाबी गँगचे कौतूक केले. यावेळी उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, प्रदिप धनके, आदी कर्मचारी उपस्थीत होते.

जामनेरात मंगळवारपासून पालिकेने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पालिका चौकात भैय्या सोनवणे व त्याचे वडील दत्तात्रय सोनवणे हे दोघे पिता-पुत्र विनामास्क फिरतांना आढळून आले. दंड केला असता त्यांनी कर्मचारी राहूल पाटील यांचेशी हुज्जत घातली. यावेळी कुणाल भदाने, मंगेश देशमुख, आशीष सहाणे, मनोज कुमावत, अनुजा जैस्वाल, दत्तू जोहरे यांचेसह कर्मचारी उपस्थीत होते. भैय्या सोनवणे वाद घालत असतांना काहींनी मोबाईलमध्ये शुटींग करून घेतले. शासकीय कामकाजात अळथडा आणल्याप्रकरणी राहूल पाटील यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

Protected Content