Home Cities जळगाव जळगावमधील डीमार्ट दालन सील; कोरोनाच्या नियमांचे उल्लंघनामुळे कारवाई

जळगावमधील डीमार्ट दालन सील; कोरोनाच्या नियमांचे उल्लंघनामुळे कारवाई

0
177

जळगाव प्रतिनिधी । कोविडविषयक प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी जळगावातील डीमार्ट हे ख्यातनाम दालन आज सायंकाळी महापालिका प्रशासनाने सील केले आहे.

कालच पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जळगाव जिल्ह्यात रात्री दहा ते सकाळी पाच या कालावधीत संचारबंदी जाहीर केली आहे. तसेच सार्वजनीक ठिकाणी व दुकानांमध्ये गर्दी करू नये असे निर्देश दिले आहेत. कुठे नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यास दंडासह गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, जळगावातील शिरसोली रोडवर असणार्‍या डीमार्टमध्ये आज सकाळपासूनच गर्दी असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. या अनुषंगाने महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज सायंकाळी डीमार्टवर छापा टाकला. यात गर्दीसह कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. यामुळे संपूर्ण दालनच सील करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound