धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अनुराज मल्टीपर्पज फाउंडेशन संचलित लिटिल चॅम्प्स इंग्लिश मिडियम स्कूल, पिंप्री खु. येथे दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी ‘तारे जमीन पर’ या थीमवर आधारित होता. गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमात सुरुवात झाली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे संत चोखामेळा यांची विठ्ठल भक्ती महाराष्ट्रातील आराध्य दैवतांचे देखावे साकारून नृत्यविष्कार विद्यार्थ्यानी सादर केले. तसेच विठ्ठल भक्तीचा महिमा, देवीचा जोगवा, लावणी, देशभक्तीपर गीत, अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, माधुरी दिक्षित, आशा पारेख इ. कलाकारांच्या गाण्यांवर नृत्यविष्कार सादर करण्यात आले.

कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पिंप्री खु. येथील सरपंच गं.भा. कमलाबाई धोबी उपस्थित होत्या. श्री. अनिल शिवनारायण पाटील माजी सभापती पंचायत समिती, दयाराम मोहकर वि. सोसायटी पिंप्री चेयरमन, मंगेश मालू वि. सोसायटी पिंप्री व्हाईस चेरमन, मनोज मालू बाबुलाल पवार पत्रकारएल. के पाटील, जी. डी. पाटील, गोपाल बडगुजर पोलिस पाटील पिंप्री, विजय पाटील सरपंच भोद, संदीप पाटील उपसरपंच भोद, सौ. कांताबाई पाटील उपसरपंच सतखेडा, हे प्रमुख अतिथी म्हणून तसेच, माजी मुख्याध्यापक श्री. बी.डी. साळुंखे सर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश बडगुजर उपस्थित होते. शाळेचे प्रास्ताविक प्राचार्या सौ. शुभांगी बडगुजर मॅडम व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश साळुंखे सर यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिकांनी विशेष मेहनत घेतली व सहकार्य केले.