गंभीर आजाराच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गंभीर आजार असल्याचे सांगून उसनवारीने घेतलेले पैसे १ लाख रूपये परत न करता सम्राट कॉलनीत राहणाऱ्या एका ४४ वर्षीय व्यक्तीची फसवणूक केली. तसेच पैसे परत मागितल्यानंतर जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सम्राट कॉलनी येथे अनिल अर्जून महाले वय ४४ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. ईलेक्ट्रॉनीक दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांच्या ओळखीतला धनराज आत्माराम पवार वय ३३ रा. ज्ञानदेव नगर, जळगाव याने गंभीर आजार असल्याचे सांगून अनिल महाले यांच्याकडून १ लाख रूपये उसनवारीने घेतले. पैसे घेतल्याचे १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिले होते. त्यानंतर अनिल महाले यांनी वेळोवेळी पैसे मागितले असता त्यांना धनराज पवार योन जीवेठार मारण्याची धमकी देवून फसवणूक केली. हा प्रकार घडल्यानंतर अनिल महाले यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी २८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता संशति आरोपी धनराज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहे.

Protected Content