भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिचर्डे येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
एस.एस.सी वर्ष २०२२.२३ परीक्षेचा निकाल हा नाशिक बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आला असून भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयाचा १० वीचा.निकाल हा ७२.७२% इतका लागला आहे. शाळेतील विद्यार्थी गौरव भगवान निकम हा ८२.४०% गुण घेऊन प्रथम आला. तर शाळेतील विद्यार्थिनी उर्मिला संतोष मोरे ही ७६.६०% गुण घेऊन दुसरी आली. तर वेदांत राजेंद्र सपके हा विघार्थी ७६.२०% गुण घेऊन तिसरा आला. एकुण शाळेचा निकाल ७२.७२% एवढा लागला दरवर्षी कापीमुक्त हा अभियान या शाळेत राबविण्यात येत असतात. सर्व यश प्राप्त केलेले विद्यार्थी हे सर्वसामान्य घरातील असून त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन प्रदीपराव पवार यांनी अभिनंदन केले तसेच पिचर्डे ग्रामपंचायत चे संरपच, उपसरपंच व त्यांच्या सर्व सदस्यांनी,विकासो.चेअरमन,व्हा.चेअरमन,पो.पाटील तसेच शाळेची स्थानिक स्कुल कमिटी घ्या सर्व पदाधिकारीनी, अभिनंदन केले. तसेच या यशामागील खरे शिल्पकार शाळेचे मुख्याध्यापक दिपक बोरसे यांनी ही अभिनंदन केले. शाळेचे शिक्षक एस.डी.पाटील,जी.के.देशमुख, पंकज पवार व शिपाई संभाजी पाटील यांनी यश संपादन केलेल्या विघार्थी व विघार्थिनी यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांचा व त्यांच्या सत्कार करून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. त्यांना पेढे भरवले तसेच पिचर्डे ग्रामस्थांनी व तरूण मित्रांनी अभिनंदन केले.