पेट्रोल पंपांवरील पाईप पारदर्शक करण्याची मागणी

54540c1d 7b76 48ab b0a2 4f1d35dca631

अमळनेर (प्रतिनिधी) पेट्रोल पंपांवर इंधन भरणारे पारदर्शक करावेत, अशी मागणी हिंदू जन जागरण समितीने प्रांताधिकारी सीमा आहिरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

बहुतांश ठिकाणी भेसळ करणे, पेट्रोल कमी देणे, मायक्रो चिपद्वारे नियंत्रित करणे आदी प्रकारातून ग्राहकांची फसवणूक होत असते. ग्राहकांना तक्रारीला पुरेसा वेळ नाही किंवा पुरेसे ज्ञान नाही म्हणून इंधन भरण्याचे पाईप पारदर्शक करण्याची ही मागणी करण्यात आली आहे.

श्री माता वैष्णवदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढही त्वरित रद्द करण्याची मागणी हिंदू जन जागरण समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. आतापर्यंत भाविकांकडून वैष्णव देवीच्या आरतीसाठी प्रत्येकी हजार रुपये घेतले जात होते परंतु संस्थांनतर्फे आता दोन हजार रुपये फी आकारण्यात येत आहे. सोयी सुविधा न देता हिंदूंवरच अधिभार लावण्यात येत आहे, देशभरातून येणाऱ्या गरीब भाविकांना धार्मिक अधिकारापासून वंचित ठेवण्याचे हे षडयंत्र आहे. त्यामुळे भक्तांची अडवणूक न करता आरतीची फी ऐच्छिक ठेवावी, अशी मागणी पंकज बागुल, मयूर चौधरी, किरण बोरसे, आशिष दुसाने, विनीत जोशी, किरण कुंभार आदींनी उपविभागीय अधिकारी सीमा आहिरे यांच्याकडे केली आहे.

Add Comment

Protected Content