नायरा पेट्रोलपंपाजवळ बेशुध्दावस्थेत पडलेल्या तरूणाचा मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जानवे गावातील ३६ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी ११ मे रोजी रात्री ११.३० वाजता नायरा पेट्रोल पंपाजवळ दिवसभरातील उन्हामुळे बेशुध्दावस्थेत पडला होता. त्याला अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषीत केले. याप्रकरणी रविवारी १२ मे रोजी मध्यरात्री २ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ईश्वर यशवंत पाटील वय-३६ रा. जानवे ता. अमळनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील जानवे गावात ईश्वर पाटील हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवारी ११ मे रोजी सकाळी ८ वाजता तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता. दरम्यान सायंकाळी ईश्वर हा घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरूवात केली. रात्री ११.३० वाजता गावाजवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ तो बेशुध्दावस्थेत मिळून आला. त्याला उन्हाचा फटका बसला असावा असे नागरीकांकडून बोलले जात होते. त्याला तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी रविवारी १२ मे रोजी मध्यरात्री २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद पाटील हे करीत आहे.

Protected Content