ज्येष्ठ नागरिकाला बांधकाम ठेकेदाराकडून जीवे मारण्याची धमकी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील एका ठेकेदाराने घरबांधणीच्या नावावर एका जेष्ठ दाम्पत्याची आर्थीक फसवणुक करण्याचा प्रकार समोर आले असुन, हातावर काम करणाऱ्या कुटुंबाचे आपल्या हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न भंगले आहे. दरम्यान पोलीसात तक्रार केल्यावर देखील संबंधीत ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई अद्याप झालेली नसल्याने हे कुटुंब हवालदिल झाले आहे.                        

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की अमृत शामराव बारी (वय ६५ वर्ष राहणार लोकेशनगर यावल) येथे राहणारे असुन त्यांनी आपल्या मालकीच्या सर्वे क्रमांक४८ / ४९मधील प्लॉट क्रमांक५६च्या १८७ .००या क्षेत्र फळावर आपले घर बांधणीचे काम ठेकेदार दिलीप दौलत पाटील ( कोळी ) राहणार भालोद तालुका यावल यांना सुमारे १४ लाख पन्नास हजार रुपयांना ठेके दिले होते. तसा लेखी करार देखील करण्यात आलेला असुन संबंधीत ठेकेदाराने दोन ते तिन महीने घराचे बांधकाम करून घराचे बांधकाम अपुर्ण अवस्थेत सोडुन पोबारा केला असुन , मागील दोन वर्षापासुन हे नवीन घराचे बांधकामासाठी लागणारे सर्व खर्च बारी यांनी एका बॅंकेकडुन हप्ते रुपाने घेतले आहे. त्या ठेकेदाराने पुर्ण कामाचे पैसे बँकेतुन काढुन देखील अद्यापपर्यंत सदरचे काम पुर्ण केलेले नसल्याचे आपली आर्थीक फसवणुक झाल्याचे निदर्शनास आल्याने अमृत बारी यांनी ३ / ०६ / २०१९ रोजी जिल्हाधिकारी जळगाव , यावल पोलीस स्टेशन आदी ठीकाणी तक्रार अर्ज केलेले असुन देखील संबंधीत फसवणुक करणाऱ्या त्या ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई अद्याप झाली नसल्याने आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न बघणाऱ्या बारी कुटुंबाचे स्वप्न भंगल्याने ते निराश्याच्या वातावरणात जिवन जगत आहेत. 

सदरच्या या ठेकेदाराच्या विरूद्ध अशा प्रकारे घर बांधणीच्या नांवाखाली इतरांची देखील आर्थीक फसवणुक झाल्याच्या तक्रार असुन , आम्ही वेळोवेळी दिलीप कोळी या ठेकेदारास आमच्या घरबांधणीचे काम पुर्ण करा अशी विनंती ही केली मात्र सदरच्या ठेकेदाराकडुन तुमच्याकडुन होईल ते करून घ्या असे सांगीतले जात असुन आमच्या कुटुंबास जिवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली असुन आम्हास लोकशाही मार्गाने आमच्या हक्का घर न मिळाल्यास आम्ही प्रसंगी आत्मदहन करू अशी मनस्थिती आमची झाल्याचे तक्रार करते अमृत सुकलाल बारी यांनी म्हटले आहे .

 

 

 

 

Protected Content