भालोद येथील मृत सैनिकाच्या वारसाला पेन्शन; सैनिक महेंद्र पाटलांच्या प्रयत्नांना यश

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील भालोद येथील माजी सैनिकाच्या विधवा पत्नीला आपल्या प्रयत्नातुन मागील महिन्यापासून मिळत नसलेले कौटुंबीक सेवानिवृत्तीचे वेतन विरावली येथील सैनिक महेन्द्र पाटीलच्या सहकार्याने व प्रयत्यनांनी सुरू झाल्याने, सैनिक पाटील यांचा भालोद येथील चौधरी कुटुंबाने सत्कार करत आभार व्यक्त केलेत.

 

त्या घटनेची विस्तृत बातमी यावल तालुक्यातिल सारे पत्रकार बंधुनी आपल्या लेखणीतुन ही माहीती नागरिकापर्यंत पहोचवली होती . अशाच प्रकारे यावल तालुक्यातिल भालोद येथिल स्व. एस एच चौधरी हे सिव्हील आर्मी मध्ये अलहाबाद ,नई दिल्ली येथे कार्य करून कलकत्ता येथुन सन१९९७  मध्ये सेवानिवृत्त झाले होते आणि त्यांना दरमहा पेंशन ही सुरु होते. परंतु चौधरी यांचे मागील ६ महीने आधी वृद्धपकाळाने निधन झाले. त्या नंतर त्यांचे सेवानिवृती वेतन बंद झाले होते आणि ते निवृत्ती वेतन त्याचे परिवारतील सदस्य त्यांचे पत्नी श्रीमती नेमिता चौधरी यांना नियमांनुसार मिळणार होते. परंतु स्व.  एस एच चौधरी  यांचे पत्नी श्रीमती. नेमिता चौधरी या निरक्षर आणि वयोवृद्ध ( ८०वय) व सोबत मुलगा  राजेश चौधरी हे गावात शेती व्यवसाय करतात तरी त्याना पुढील फॅमिली सेवानिवृत्ती वेतन संबंधी पत्रव्यहार कसे काय करावे लागतात हे ही या परिवाला प्रक्रियेची माहिती नव्हती.

भालोद येथिल स्व. एस एच चौधरी यांचा मुलगा राजेश चौधरी हे यावल येथे आले असता त्याना एलआईसीचे वीमा सल्लागर मुकेश घोडके हे भेटले असता त्यांना राजेश चौधरी यांनी सैनिक महेन्द्र पाटील यांना संबंधी आपली समस्या सांगितली. तेव्हा मुकेश घो़डके यांना २०१९ चे पेंशन चे संबंधी बातमीची आठवण करत सैनिक महेंद्र पाटिल यांच्याशी संपर्क केला. त्या वेळी सैनिक महेंद्र पाटील यांनी घटना आणि स्वर्गीय एस एच चौधरी माजी सैनिक यांचे कुटुंबांनी संदर्भ भालोद येधिल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण शशीकांत चौधरी यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार (मुन्ना भाऊ) पाटील विरावली यांचे मार्फत या परिवार बद्दल शहनिशा करून घेत तत्काळ सारे कागदपत्रे आणि काही दाखले हे मुकेश घोडके यांचे बंधु जितेंद्र घोडके व विशाल कायस्थ यांच्या मार्फत तत्काळ सारे कागदपत्र  मेल केले.

त्या कागदपत्रांच्या सहायाने बीएसएफ मधे सहाय्यक उपनिरिक्षक / क्लर्क महेंद्र पाटील यांनी सारे कागदपत्रांच्या आधारे आणि या आधीच्या वर्ष २०१९ ला यावलचे वीर जवान सैनिक संतोष कोळी यांच्या आईना मिळवून दिलेल्या पेंशनच्या अनुभवानुसार आवेदन तयार करून सारे कागजाद सोबत जोडून मैल द्वारे यावल येथील तहसील चे कर्मचारी संतोष पुंडलिक पाटील यांना पाठवून नेमिता चौधरी यांच्या मार्फत मान्य तहसीदार ऑफिसला सत्यापीत करून सारे पूर्ण कागदपत्रे ही मुंबई, आर्मी ऑफिस  इलहाबाद(प्रयागराज ), नई दिल्ली येथे पाठवून दिले व सोबत मुंबई येथे कार्यरत यावलचे हितेश गजरे यांचे भाऊ पंकज हिवरे यांनाही बेलापुर मुंबई येथील पेंशन कार्यालयात या कामी संपर्क करण्यास सांगितले ही सारी कार्यवाही १५ दिवसात पूर्ण झाली.

शेवटी ८ दिवसंपूर्वी येथील स्व. एस एच चौधरी त्यांचे पत्नी श्रीमती नेमिता चौधरी यांचे खात्यात सारे रक्कम जमा झाली आहे. या कार्यकरिता सैनिक महेंद्र पाटील यांचे नगरसेकवक प्रा. मुकेश येवले, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेकवक यांनी कौतुक केले आहे. दरम्यान आज यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभाहॉल मध्ये सेवानिवृत्त मयत सैनिकाच्या कुटुंबास न्याय मिळुन दिल्याबद्दल सैनिक महेन्द्र पाटील यांचा भालोदचे जेष्ठ शेतकरी शशीकांत चौधरी यांच्या हस्ते कृउबाचे सभापती तुषार पाटील, संचालक नारायण चौधरी, पप्पु जोशी, मुकेश घोडके, राजेश चौधरी यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आले.

 

Protected Content