केळी पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्या – ना. गिरीश महाजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२१-२२ ची नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ बँक खात्यात वितरित करण्यासाठी यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचा सूचना आज ना. गिरीश महाजन यांनी जळगाव अभिजीत राऊत यांना केल्या.

हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२१-२२ अंतर्गत केळी पिकाच्या विमाधारक शेतकऱ्यांना कमी व जास्त तापमान, वादळी वारा व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत जळगाव जिल्ह्यातील अंदाजित पात्र ५० हजार विमाधारक शेतकऱ्यांसाठी रक्कम ३७५ कोटी रुपये झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांनी केळी पिक विमा उतरवला होता त्यांना अंदाजे रक्कम ३७५ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झालेली असून सदरील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नसल्याने आज महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास वैद्यकीय शिक्षण व क्रीडा कल्याण मंत्री ना.गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना पिक विमा समितीचे अध्यक्ष या नात्याने आपण संबंधित विमा कंपनीस सदरची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा करण्याबाबत सूचना देण्याचे आदेश दिले आहेत.

जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान कमी तापमानामुळे तसेच मार्च ते मे २०२२ दरम्यान जास्त तापमानामुळे व यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव इ .या तालुक्यांमध्ये मे ते जुलै २०२२ दरम्यान झालेल्या वादळी वारे व गारपिटीमुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यावेळी ना.गिरीश महाजन यांनी तात्काळ संबंधित विमा कंपनीस पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेवर उपलब्ध करून देणे बाबतच्या सूचना केल्या आहेत.

Protected Content