कोरोनाच्या मुकाबल्यासाठी आता पॅसिव्ह वॅक्सीन

 

बर्लिन: वृत्तसंस्था । शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूच्या विरोधात अत्याधिक प्रभावी अॅण्टीबॉडीचा शोध लावलाा आहे. या अॅण्टीबॉडीच्या मदतीने पॅसिव्ह वॅक्सीन तयार करता येणे शक्य होणार आहे. पॅसिव्ह वॅक्सीनद्वारे शास्त्रज्ञ आधीच सक्रिय असलेले अॅण्टीबॉडी मानवी शरीरात दाखल करतात. तर, अॅक्टीव वॅक्सीन मानवी शरीरात स्वत: हून अॅण्टीबॉडी तयार करतात.

जर्मन सेंटर फॉर न्यूरोडीजेनेरेटिव डिसीज आणि चॅरिटे यूनिवर्सिट्समेडिजिन बर्लिनच्या वैज्ञानिकांनी कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातून जवळपास ६०० वेगवेगळ्या अॅण्टीबॉडी घेतल्या. प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीतून या ६०० अॅण्टीबॉडीजपैकी सक्रिय असणाऱ्या काही अॅण्टीबॉडीजची ओळख पटवली. त्यानंतर शास्त्रज्ञांनी सेल कल्चर्सचा वापर करून कृत्रिम पद्धतीने अॅण्टीबॉडी तयार केल्या.

कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आलेल्या न्यूट्रलाइजिंग अॅण्टीबॉडी विषाणूला बांधतात. क्रिस्टलोग्राफिक विश्लेषणच्या माध्यमातून शास्त्रज्ञांनी सांगितले की, या अॅण्टी बॉडी विषाणूला मानवी शरीराच्या पेशीत प्रवेश करणे आणि त्यांच्या विकसित होण्याच्या प्रक्रियेला थांबवतात. अॅण्टीबॉडीच्या माध्यमातून काही विषाणू इम्यूनच्या विषाणूंचा खात्मा करतात, असा दावा त्यांनी केला.

उंदिरांवर केलेल्या प्रयोगात शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले. उंदिराच्या शरीरात विषाणूविरोधात या अॅण्टीबॉडी प्रभावी असल्याचे आढळून आले. या संशोधनाचे समन्वयक जेकब क्रेय यांनी सांगितले की, उंदिरांमध्ये कोरोनाच्या विषाणूने बाधित केल्यानंतर ही अॅण्टीबॉडी देण्यात आली. त्यांच्यात प्रभाव कमी दिसू लागला. ज्या उंदिरांना बाधित होण्याआधी अॅण्टीबॉडी दिली. त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

विज्ञानविषयक नियतकालिक सेलमध्ये याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. उंदिरांमधील पेशी मानवी शरीरातील पेशींसारखे असतात. त्यामुळेच शास्त्रज्ञांनी ही अॅण्टीबॉडी माणसांवरही प्रभावी ठरेल असा दावा केला आहे.

जगभरातील बाधितांची संख्या ३ कोटी २४ लाखांहून अधिक झाली. त्यापैकी ९ लाख ८७ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. युरोपातील काही देशांमध्ये दुसरी लाट आल्याची स्थिती आहे. कॅनडाने लाट आली असल्याचे जाहीर केले आहे. नागरिकांनी दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content