इंडियन अॅप स्टोर्सवर नवीन चायनीज अॅप्सची वाढ

 

नवी दिल्लीः वृत्तसंस्था । भारताने तीन टप्प्यात अनेक चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. हे अॅप्स आता भारतीय युजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन नवीन पद्धत अवलंबत आहे. काही महिन्यात इंडियन अॅप स्टोर्सवर नवीन चायनीज अॅप्सची वाढ आली आहे. त्यात चिनी अॅप्सचे रिब्रँडेड व्हर्जन सुद्धा समावेश आहे. भारताने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतोय असे सांगून बंदी घातली होती. भारताने आधी टिकटॉकसह ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर जुलैमध्ये ४७ अॅप्स आणि सप्टेंबर मध्ये ११८ अॅप्सवर बंदी घातली होती.

त्यांनी नवीन रूप घेवून भारतात एन्ट्री घेतली आहे. प्रसिद्ध Snack video नावाचा व्हिडिओ अॅप Tencent च्या मालकीच्या kuaishou नावाच्या चीनी कंपनीने बनवला आहे. स्नॅक व्हिडिओ अॅपला गुगल प्ले स्टोरवर १० कोटी हून अधिक वेळा डाउनलोड केले आहे. या अॅपमध्ये युजर्संना प्रसिद्ध शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप टिकटॉक सारखे फीचर्स दिले आहेत.

भारताने Hago अॅपवर बंदी घातली आहे. अज्ञात लोकांसोबत चॅट रूम बनवण्यासाठी आणि गेम खेळण्याची सुविधा देत होता. आता या अॅपच्या जागी Ola Party नावाचा अॅप आला आहे. यात गेम खेळण्याची सुविधा मिळत नसली तरी या अॅप्समध्ये Hago यूजर्स ची प्रोफाइल, फ्रेंड्स आणि चॅट रूम्स ला इंपोर्ट केले आहे. म्हणजेच हागो युजर्स थेट ओला पार्टीवर साइन इन करू शकते.

Protected Content