जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुजरात येथील वडोदरा येथे पारुल युनिव्हर्सिटी येथे ५ व्या गुजरात छात्र संसदचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जळगावचे ६ युवक गुजरातला रवाना झाले आहे.
रविवार दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी संपन्न होत असलेल्या ५ व्या गुजरात छात्र संसदमध्ये रोहित भामरे, आयुष्य कस्तुरे, विराज कावडीया, प्रीतम शिंदे, शंतनू नारखेडे, अलफैझ पटेल या युवकांचा यामध्ये समावेश आहे.
गुजरात छात्र संसदेत मुख्य वक्ता म्हणून राज्यपाल किरण बेदी, प्रकाश बेलेवाडी, मौलाना कलबे रशेड रिझवी, कैलास विजयवर्गीय, शकुन बात्रा, आनंद शीला, रंजन गोगोई, आनंद नरसिम्हन, चारू प्रज्ञा आदी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर युवकांना मार्गदर्शन करत आहेत.
देशासमोरील विविध समस्यांबर चर्चा करण्यात येणार आहे. या विषयांवर युवक आपले मत मांडणार आहेत. देशभरातून १५००० विद्यार्थी सभागी होणार आहेत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील युवक प्रतिनिधी ६ युवक सहभागी झाले आहेत.