Beating : जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला बेदम मारहाण

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शेवाळे येथे मागील भांडणाच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ व मारहाण केल्यानंतर जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लताबाई पाटील (वय-४५) रा. शेवाळे ता. पारोळा हे आपल्या मुलगा आणि मोठा मुलगा यांच्यासह वास्तव्याला आहे. शेती काम करुन आपला उदरनिर्वाह करतात.

सोमवार, दि.१८ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास लताबाई पाटील ह्या घरी एकट्या असतांना जुन्या भांडणाच्या कारणावरून गल्लीत राहणाऱ्या कल्‍पनाबाई श्रीराम पाटील, श्रीराम लोटन पाटील, सचिन श्रीराम पाटील, रामचंद्र लोटन पाटील, भैया रामचंद्र पाटील सर्व राहणार शेवाळे ता. पारोळा यांनी शिवीगाळ करून मारहाण करून जखमी केले. तर एकाने तिच्या पतीला फायटरने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी लताबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनिल वानखेडे करीत आहेत.

Protected Content