‘स्वाभीमानी’ने पीक विमा कार्यालयास ठोकले टाळे !

पारोळा प्रतिनिधी | नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळण्यास होत असलेल्या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे येथील पीक विमा कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील शेतकर्‍यांना पिक विम्याचे पैसे आतापर्यंत अल्प शेतकर्‍यांना विम्याची रक्कम मिळाली आहे. पंचनाम्यात विमा प्रतिनिधींनी घोळ केलेला आहे. शासन निर्णयमध्ये उल्लेख आहे, १००% नुकसान झाल्यास कपाशी या पिकाला ४० हजार रू. मिळतील असा उल्लेख असतांना शेतकर्‍यांच्या खात्यात ८ हजार ते १० हजार रुपयेच येत आहे. खरं तर, बरतयाच शेतकर्‍यांना ऑनलाईन तक्रार देता आली नाही. जर नुकसान सरसकट १००% झाले असेल. तर विमा कंपनी ने सरसकट प्रत्येक शेतकर्‍याला हेक्टरी ४० हजार रु अनुदान द्यायला पाहिजे.

शेळावे मंडळात अतिवृष्टी होऊन देखील अद्याप अनुदान मिळाले नाही. चोरवड आणि पारोळा मंडळाला अतिवृष्टीचे अनुदान मिळाले. २८ व २९ ऑगस्ट या तारखेला ६५ मिली मीटर पेक्षा अधिक पाऊस पडून सुद्धा शेळावे मंडळला अनुदान मिळालेले नाही. यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेने पीक विमा कार्यालयास टाळे ठोकले. टाळे ठोकताना व निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, तालुका अध्यक्ष अमोल पाटील, पंकज सूर्यभान पाटील मस्वे, नामदेव पाटील, रणजीत पाटील, योगेश पाटील, प्रकाश पाटील, दिलीप पाटील व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते

दरम्यान, आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही १४ डिसेंबर पासून आमरण उपोषण करू असा इशारा देखील स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आलेला आहे.

Protected Content