पारोळ्यात संत जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दुचाकी रॅली

parola news 3

पारोळा प्रतिनिधी । संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जुने तेली भवनात मंगळवारी सकाळी संताजी महाराजांचे अभिषेक व पूजा करण्यात आली. व त्यानंतर शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.

तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांची ३९५वी पुण्यतिथीनिमित्ताने सकाळी 8 वाजेला मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जुने तेली भवन येथून मोटरसायकलला सुरुवात झाली. आझाद चौक, भवानी चौक, राम मंदिर चौक, रथ चौक, मोहाडी चौक, महाराणा प्रताप चौक, एक नंबर शाळा व नवीन तेली भवन येथे संताजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रॅलीमध्ये शेकडो समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. पारोळा शहर मोटरसायकल रॅली अभिवादन करण्यात आले व सायंकाळी पुण्यतिथीनिमित्तान निमित्ताने रथावर संताजी महाराज यांचे मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी पारोळ्याचे पो.नि. लीलाधर कानडे आरतीचे मानकरी होते व त्यांच्या हातून सायंकाळी आरती करण्यात आली. यावेळी तेली समाजाचे अध्यक्ष महेश चौधरी, नगरसेवक कैलास चौधरी, नगरसेवक अशोक चौधरी, नगरसेवक भैय्या चौधरी, अमृत चौधरी, गोकुळ चौधरी, मनोज चौधरी, निंबा चौधरी, भागवत चौधरी, पत्रकार देविदास चौधरी, पत्रकार विकास चौधरी, वनवे मंडळाचे अध्यक्ष राहुल चौधरी, तेली समाज पंचमंडळ व नवयुवक मंडळ बजरंग दलाचे भैया चौधरी व तालुक्यातील व शहरातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content