पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पारोळा पो. स्टे. हद्दीतील फिर्यादी भटू चौधरी रा. राजवड ता. पारोळा यांचे शेतातून दोन बैल तीस हजार रुपये किंमतीचे अज्ञात चोरट्यांनी दि 3 जुलै रोजी रात्री चोरून नेले होते. फिर्यादीचे फिर्यादीवरून बैल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवले असतात आरोपीस अटक करून बैलाची किंमत तीस हजार रुपये हस्तगत केले.
पारोळा शेवडी गल्ली येथे राहणारे फिर्यादी नामे भैय्या सुदाम चौधरी यांच्या एकूण 25 बकऱ्या चोरीस गेलेल्या होत्या व दिलेले फिर्याद वरून बकरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शन खाली पो. ना. प्रवीण पाटील यांनी पो. ना. संदीप सातपुते, पो. कॉ. अभिजित पाटील, पो. कॉ. किशोर भोई, पो. कॉ. राहुल पाटील, पो. कॉ. राहुल कोळी, पो. कॉ. हेमचंद्र साबे यांनी आरोपी नामे 1) महेंद्र गणेश सुदाम पाटील 2) वाल्मिक भगवान पाटील 3)संजय सोमा पाटील, 4)अंकुश नेहरू पाटील 5) मनोज सुनील बेलेकर सर्व रा. पळासखेडे ता. पारोळा 6) शेख बशीर शेख बिबन वय 38 वर्ष रा. बोरगाव सारवणी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद असे निष्पन्न करून एकूण 18 गुन्हे उघडकीस आले होते.
त्यापैकी शेतकरी छोटू चौधरी यांचे बैल चोरी करून आरोपी क्र 6 यास विकलेचे निष्पन्न झालेने चोरीचा माल विकत घेणारे आरोपीस अटक करून बैलाची किंमत तीस हजार रुपये हस्तगत करून आरोपींना पारोळा पोलिसांनी अटक करून चोरून नेलेले बैलाची किंमत 30000/-रुपये जप्त केलेले के. के. माने पारोळा न्यायालय यांचे आदेशावरून फिर्यादिस पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी शेतकऱ्यास रोख रुपये परत दिले आहे.