जळगाव येथे तीन दिवसीय विज्ञान आणि गणित कार्यशाळा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे आणि भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्थेतील शाळांमधील इनोव्हेशन कोचेस तयार करण्यासंदर्भात तीन दिवसीय विज्ञान आणि गणित कार्यशाळा जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या सह्ययोगाने यशस्वीरित्या सुरू झाली.

या कार्यशाळेचे प्रयोजन हे iRISE (आयराईज) उपक्रमाअंतर्गत शिक्षकांना नवोपक्रम, STEM शैक्षणिक आशय ज्ञान आणि मूल्यमापन साधनांवर मार्गदर्शन करणे आहे. ह्या कार्यशाळेनंतर, शिक्षक शाळेतील मुलांमध्ये सर्जनशीलता, समस्या सोडवण्याचा नाविन्यपूर्ण दृष्टीकोन रुजवण्याचा प्रयत्न 7 i इनोवेशन मॉडेल, प्रशिक्षण पद्धत, सत्राच्या संकल्पना, पद्धती आणि धोरणे यांच्या द्वारे करतील. सर्व सत्रांचे नियोजन दुसऱ्या टप्यातील इंनोव्हेशन चॅम्पिअन्स, ( महेंद्र नेमाडे, अल्का धाडे, मानसी उपासनी, प्रविण पाटील) तसेच iRISE टीम (शिवानी आग्रे, हर्षा कुलकर्णी, सुशांत पवार) यांच्या द्वारे घेण्यात येईल.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार, आयसर पुणे,ब्रिटिश कौन्सिल, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, टाटा टेक्नॉलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित आयराईझ (iRISE) टीचर डेव्हलमेंट प्रशिक्षणच्या तिसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय कॅस्केड प्रशिक्षण दि. सप्टेंबर 13 – 15 , 2022 दरम्यान ए टी झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास वरिष्ठ अधिव्याख्याता डाएट जळगाव, शैलेश पाटील, वरिष्ठ अधिव्याख्याता डाएट जळगाव नरेंद्र पालवे, पर्यवेक्षकए टी झांबरे माध्यमिक विद्यालय, ह्यांच्या सह शिवानी आग्रे, हर्षा कुलकर्णी, सुशांत पवार नितीन तिवाने, iRISE प्रोग्राम, आयसर पुणे यांचा सहभाग लाभला.

जिल्ह्यातील 60 गणित व विज्ञान शिक्षकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सर्व सहभागी शिक्षकांना गणित व विज्ञान शिकविण्यास उपयोगी अशा क्रियाकलापांसाठी उपयोगी असे किट्स, तसेच प्रमाणपत्र देण्यात येईल.

Protected Content