Home आरोग्य डॉ. सतीश पाटील यांनी केली कोरोनावर मात

डॉ. सतीश पाटील यांनी केली कोरोनावर मात

0
37

पारोळा प्रतिनिधी । माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी कोरोनावर मात केली असून नाशिक येथे उपचार केल्यानंतर ते घरी परतले आहेत.

काही दिवसांपूर्वी डॉ. सतीश पाटील हे कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे २३ रोजी चाचणीतून निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर नाशिक येथील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार करण्यात येत होते. या उपचारांच्या नंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

रविवारी सायंकाळी डॉ. सतीश पाटील हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले. या वेळी त्यांच्या पत्नी रेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील, तालुका अध्यक्ष यशवंत पाटील, डॉ. राहुल कुंवर, अ‍ॅड. तुषार पाटील, डि. के. पाटील, गुलाब पाटील, अभिषेक पाटील, संजय बागडे यांनी त्यांचे पुष्पवर्षावात स्वागत केले. शासकीय नियमांनुसार होम क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण करून आपण पुन्हा समाजकारणात सक्रीय होणार असल्याचे डॉ. सतीश पाटील म्हणाले.


Protected Content

Play sound