पारोळा येथील भुईकोट किल्ल्याची साफसफाई

पारोळा प्रतिनिधी । शहराचे वैभव असणार्‍या भुईकोट किल्ल्याची धुळे येथील राजा शिवछत्रपती परिवारातर्फे साफसफाई करण्यात आली.

धुळे येथील राजा शिव छत्रपती परिवारातर्फे भुईकोट किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांच्याहस्ते या मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. या वेळी नाशिक पुरातन विभागाच्या सहायक संचालिका आरती ओळे, धुळे येथील राजा शिवछत्रपती परिवाराचे प्रमुख सागर साळवे, जळगाव येथील परिवाराचे प्रमुख संतोष पाटील, अनिकेत पाटील, शुभम पाटील, हेमंत पाटील, लोकेश पाटील, राहुल पाटील, डॉ. गोपाळ पाटील, अविनाश पाटील, किरण शिरसाठ, राहुल पाटी आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

दरम्यान, परिवाराच्या कार्यकर्त्यांनी किल्ला परिसरातील झाडी, झुडपी, घाण साफ केली. या वेळी कार्यकर्त्यांनी जवळपास १० ट्रॅक्टर कचर्‍याची साफसफाई केली. ही मोहिम वर्षभरात महिन्यातील एका रविवारी सुरु ठेवण्यात येईल, अशी ग्वाही या वेळी प्रमुखांनी दिली.

नगराध्यक्ष करण पवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. पालिकेच्या माध्यमातुन शहरात विकास कामे होत आहे.पुरातन वास्तु असलेला किल्ल्याचा परिसर पुरातत्व विभागाकडे येत असल्याने पालिकेकडुन वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.मात्र आता दत्तक योजनेतुन किल्लास पुन्हा कसे वैभव प्राप्त करता येईल यासाठी प्रयत्नशिल राहुन किल्ल्यास पर्यटन स्थळ कसे करता येईल यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगुन शिवप्रेमींनी स्वच्छता मोहीमेत सक्रिय सहभाग दिल्याचे त्यांचे मनापासुन नगराध्यक्ष करण पवार यांनी आभार मानले.

Protected Content