पारोळा प्रतिनिधी । येथील कुटीर रूग्णालयात एकच वैद्यकिय अधिकारी असल्याने तालुक्याहून आलेल्या रूग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. याकडे जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी यांच दुर्लक्ष होत असून त्वरीत वैद्यकिय अधिकाऱ्यांची नियुक्त करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बजरंग दालातर्फे करण्यात आले आहे.
पारोळा गाव हे तालुक्याचे ठिकाण व राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. असे असतांना तालुक्याला लागून 114 खेडे आहेत व रस्त्यावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे ३५ किमीच्या हद्दीत दररोज अनेक छोटे मोठे अपघात होत असतात. त्या दृष्टीने बघता पारोळा कुटीर रुग्णालयात सुविधांचा अभाव आहेच. परंतु गेल्या १ ते २ महिन्यापासून डॉ.योगेश साळुंखे यांची बदली शेळावे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आल्याने कुटीर रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना सकाळी १० वाजेपर्यंत डॉक्टरांची वाट पाहावी लागते.
आजतर रूग्णाणच्या डोक्यावरून पाणी जायला लागल्याने संतप्त रुग्णांनी पारोळ्याचे आरोग्य अधिकारी नइम शेख यांना विचारले की याठिकाणी खेड्या पाड्या वरून मोठ्या संख्येने गरीब वर्ग येत यांना सुविधा अभावी बाहेर बसावे लागत आहे. यावर डॉक्टरांनी सांगितले की मी एकटा डॉक्टर असल्यामुळे मी इतक्या जणांना एकाच वेळेस बघू शकणार नाही, तुम्ही अजून एक डॉक्टरांची मागणी करा, असे उत्तर दिले. याकडे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे याकडे कुणीही ढुंकून पाहण्यास तयार नसल्याचे रुग्णानीं बोलून दाखविले.
त्यानुसार दोन वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती करावी अन्यथा आम्ही उपोषणास बसू असा इशारा बजरंग यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे. यावेळी बजरंग दलाचे नितीन बारी, आबा पवार, समाधान धनगर, भैय्या चौधरी, मनोज चौधरी, चेतन पाटील, गोरख चौधरी, सागर कुंभार, नंदू लोहार व तालुक्यातील सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.