ट्रक व कारच्या अपघातात ११ जण जखमी

पारोळा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील म्हसवे शिवारातून जाणार्‍या महामार्गावर ट्रक व प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनाचा अपघात झाल्याने ११ जण जखमी झाले आहेत.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील म्हसवे शिवारातील सहयोग हॉटेलजवळ, ट्रक व प्रवासी वाहतूक करणार्‍या मॅक्झिमो गाडीचा अपघात झाला. एरंडोलकडून धुळे येथे जाणारी मॅक्झिमो गाडी (क्र.एम.एच.१४-इ.सी ३५७८) व समोरून येणारा ट्रक (एम.एच-१८-बी.ए.४३११) यांच्यात जबर धडक झाली. त्यात मॅक्झिमो गाडीतील बादल अशोक पाटील (रा.भुसावळ), चंद्रकला जोहरु रखमे, जोहरु नथ्थु रखमे, चंद्रकांत संतोष रखमे (तिघे रा.नाशिक), मॅक्झिमो चालक समाधान संपत पारधी (रा.भालगाव, ता.धरणगाव), आसिफ नथू बागवान, रिजवान आसिफ बागवान, हुसेफ आसिफ बागवान, उमेर आसिफ बागवान (रा.म्हसावद, ता.एरंडोल), उषाबाई छोटू पाटील, छोटू प्रल्हाद पाटील (रा.जैतपीर, ता.अमळनेर) यासह ट्रक मधील काशीराम गुठलिया चौकारीया, सुनील मुठलीया चौकाराम (दोघे रा. सेंधवा) हे जखमी झाले.

अपघातात जखमी झालेल्यांवर पारोळा येथील कुटीर रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले आहेत. तर, या अपघातातील काहींची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना धुळे आणि जळगाव येथील खासगी रूग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहेत.

Protected Content