जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक प्रियंका पाटील यांनी वाहन परवाना काढतानाची नियमावली आणि लहान मुलांना वाहने चालवण्यास देताना पालकांनी घ्यावयाची काळजी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
श्रीमती पाटील यांनी सांगितले की, वाहन परवाना मिळवण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच, त्याला वाहतूक नियम आणि चिन्हे यांची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष वाहन चालवून दाखवण्याची चाचणी उत्तीर्ण करावी लागते. पालकांनी लहान मुलांना कोणत्याही परिस्थितीत वाहने चालवण्यास देऊ नये. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणे कायद्याचे उल्लंघन असून ते मुलांसाठी आणि इतरांसाठी धोकादायक ठरू शकते.
पालकांनी मुलांना वाहतूक नियमांविषयी माहिती द्यावी आणि जबाबदारीने वाहन चालवण्याचे महत्त्व पटवून सांगावे. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांची विशेष काळजी घ्यावी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी खेळण्यास सांगावे, असे आवाहन प्रियंका पाटील यांनी केले आहे.