पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील माता – पिता आपल्या अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेल्याची तक्रार गेल्या तीन महिन्यापासुन पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये नोंदवली आहे. मात्र तब्बल तीन महिने उलटूनही पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी कुठलीच चौकशी न केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीच्या पित्याने केला असुन आपली मुलगी परत मिळावी. व पळविणाऱ्यास व सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी माता – पित्यांनी २ ऑक्टोंबरपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे
सतिष बाबुलाल धनगर हे पोलिस स्टेशन पिपळगांव (हरेश्वर) हद्दीतील लोहारा, ता. पाचोरा या गावचे कायमचे रहिवासी असून ते कुंटूंबासह लोहारा येथे वास्तव्यास आहे. दरम्यान त्यांची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगीस घरातुन १६ जुन २०२३ रोजी रात्री ९.३० ते १७ जुन २०२३ च्या सकाळी ४ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन, आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी पिपळगांव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये १७ जुन २०२३ रोजी मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान त्यांनी राहत्या लोहारा गावी शोध घेतला असता अशी माहिती मिळाली की, लोहारा बस स्टॅन्डवर असलेल्या कृष्णा मोबाईल शॉपी या दुकानाचा चालक असलेला कृष्णा रामदास पाटील, रा. जंगीपुरा, ता. जामनेर, जि. जळगांव हा देखील १७ जुन २०२३ पासुन फरार आहे. त्यामुळे त्यानेच सतिष धनगर यांच्या मुलीस फुस लावून पळवून नेलेले असल्याबाबत त्यांची पक्की खात्री झालेली आहे. सदरील इसमाचे आई, वडील हे जंगीपुरा, ता. जामनेर येथे वास्तव्यास आहेत व त्याचा एक भाऊ ईश्वर रामदास पाटील हा सिल्वासा (गुजरात) येथे राहतो. सदर इसमाचे लोहारा. ता. पाचोरा येथील रहिवासी असलेले अमोल पाटील (गोधळे), महेंद्र दिलीप घोंगडे, मो. नं. ९११२६०६०१२ आणि जंगीपुरा, ता. जामनेर येथील रहिवासी व सध्या पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यास असलेले पोलिस कर्मचारी संदिप राजपुत यांच्या तसेच तो त्याच्या आई वडीलांच्या देखील संपर्कात असल्याबाबत त्यांना खात्री आहे. व वर नमुद सर्व जण त्यास आप आपल्या परीने मदत व सहाय्य करत असल्याबाबत सतिष धनगर यांना संशय आहे.
म्हणुन सदरचा गुन्हा हा जळगांव येथे स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा कारण सदरील इसमाने सतिष धनगर यांच्या अल्पवयीन मुलीचा घातपात केला असल्याचा मला दाट संशय व्यक्त केला आहे. म्हणुन संशयीतांना ताब्यात घेवुन कसुन चौकशी करण्यात यावी व सतिष धनगर यांच्या अल्पवयीन मुलीस शक्य तितक्या लवकर त्यांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागण्यांसाठी सतिष बाबुलाल धनगर व छायाबाई सचिन धनगर हे पाचोरा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयासमोर २ ऑक्टोंबर २०२३ पासुन आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आमरण उपोषणास लोहारा येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते शांताराम बेलदार, पाचोरा येथील बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील, खंडु सोनवणे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.