जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरात आज २० मार्च रोजी, पक्षी दिनानिमित्त डॉक्टर अनुज पाटील व डॉक्टर लीना पाटील यांच्या वतीने स्वामी समर्थ महाराज ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी पालखी सोहळ्याच्या मार्गात परळ वाटप करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नागरिकांना आपल्या घराच्या गॅलरीत परड ठेवून त्यात पाणी व धान्य टाकण्याचे आवाहन करण्यात आले, जेणेकरून पक्षांना उन्हाळ्यात मदत मिळेल.
या संकल्पनेची प्रेरणा वसंत पाटील यांच्या एका फोनमधून मिळाली. त्यांनी डॉक्टर अनुज पाटील यांना स्वामी समर्थ केंद्राच्या पर्यावरण विभागाबद्दल सांगितले, जो स्वच्छता, झाडे, व पक्ष्यांसाठी विविध उपक्रम राबवतो. वसंत पाटील यांनी सुचवले की, डॉक्टर अनुज पाटील फाउंडेशन तर्फे पक्ष्यांसाठी परळ वाटप करावे. या संकल्पनेला डॉक्टर लीना पाटील यांनीही पाठिंबा दिला आणि त्यांचा हा विचार प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्णय घेतला.
उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना, स्वामी समर्थ पायी पालखी सोहळ्याच्या मार्गावर प्रत्येक केंद्रात दोन परळ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, एकूण १०० परड त्र्यंबकेश्वरपर्यंत कॅरी करण्यात येणार आहेत. ही कल्पना फक्त पालखी सोहळ्यासाठीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांनाही प्रेरणा देणारी आहे. या उपक्रमाचा एक सकारात्मक प्रभाव हॉस्पिटलमध्येही दिसून आला. डॉक्टर लीना पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये हा उपक्रम पाहून काही कर्मचाऱ्यांनीही आपापल्या घराच्या परिसरात परळ ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे हा उपक्रम केवळ एक पायरी पुढे जात नव्हता, तर पर्यावरणप्रेमी नागरिकांना प्रेरणा देणारा ठरत होता.
“माझे शहर, माझी जबाबदारी” या संकल्पनेला अनुसरून हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतो. उन्हाळ्याच्या दिवसांत पक्ष्यांना पाणी आणि धान्य मिळावे, यासाठी नागरिकांनीही आपल्या घराच्या बाल्कनीत, गच्चीवर किंवा अंगणात परड ठेवावी, असे आवाहन डॉक्टर लीना पाटील यांनी केले. या उपक्रमाने प्राण्यांबद्दल आपुलकी वाढवण्याचा आणि पर्यावरण संवर्धनाचा एक नवा संदेश दिला आहे.
खाली पहा याबाबतचा व्हिडिओ :