जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त शहरातील कोळी समाज बांधवांतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त प्रतिमेचे भव्य शोभायात्रा रविवारी दुपारी ४ वाजता काढण्यात आली.
आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त वाल्मिकी समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून घोड्यांच्या रथावर महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून मिरवणूकीला सुरूवात करण्यात आली. विशेष म्हणजे या मिरवणूकीत महाबली हनुमानच्या वेशाचे खास आकर्षण होते. ही मिरवणूक नेहरू पुतळा चौक, शास्त्री टॉवर चौक, भिलपूरा चौक, सुभाष चौक मार्गे चित्रा चौकदरम्यान काढण्यात आली. याप्रसंगी मिरवणूकमध्ये उपस्थित वाल्मिकी समाजातील बांधवाना बिस्कीट व पिण्याचे पाणीचे वाटप करण्यात आले होते. कोळी समाज बांधवांसह समाजातील कार्यकर्त्यांनी मिरवणूक वाजत गाजत जल्लोषात साजरी केली.
भाग १
भाग २