नाभिक समाजातर्फे धरणगाव तहसीलदारांना निवेदन

धरणगाव प्रतिनिधी । येथील नाभिक समाजातर्फे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी या मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, कोरोनाच्या आपत्तीमुळे गेल्या तीन महिन्यांपासून नाभिक समाज बांधवांचे सलून व्यवसाय बंद आहेत म्हणून त्यांच्यावर उपासमार ची वेळ आलेली आहे. तरी सरकारने लवकरात लवकर सलून दुकाने उघळण्यासाठी परवानगी द्यावी व सलून दुकानदार ,कारागीर यांना १०००० रुपये अनुदान देण्यात यावे,तसेस या व्यवसायासाठी सुरक्षा म्हणून शासनाने सुरक्षित किट उपलब्ध करून द्यावी.अश्या मागण्यांसाठी धरणगाव तहसीलदार साहेब यांना समस्त नाभिक समाज धरणगाव तर्फ निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी नाभिक समाज अध्यक्ष सतीश बोरसे,महेश निकम,दिलीप गायकवाड, राजेंद्र फुलपगार, गोपाळ फुलपगार, प्रशांत फुलपगार, मोहन फुलपगार,ज्ञानेश्‍वर झुंजारराव, दिगंबर निकम,रवी निकम,कमलेश बोरसे, अनंत फुलपगार,मुन्ना झुंजारराव, मोहन फुलपगार, बाडू फुलपगार, राजू बोरसे,गणेश झुंजारराव, संदीप निकम,पवन निकम,विनोद झुंजारराव,चंद्रकांत फुलपगार, हेमंत फुलपगार आदी समाज बांधव उपस्थित होते.

Protected Content