अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या आठवड्यापासून अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह अक्कलपाडा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने अक्कलपाडा धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या दोन्ही तिरावर नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान पांझरा मध्यम प्रकल्पातून रविवारी सकाळी १० वाजेपासून ८ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. पुढील तासात विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने पांझरा नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा व खबरदारी घ्यावी असे आवाहन धुळे मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.