सोलापूर प्रतिनिधी । आषाढी एकादशी निमित्ताने लाखो भाविक विठूरायांचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. यावेळी मोठया प्रमाणात वारकरींची गर्दी पाहवयास मिळत असते. मात्र, वारीतील गर्दी लक्षात घेवून अप्पर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी ड्रोन कॅमेराने छायाचित्रण करण्यास मनाई केली आहे.
तसेच, पंढरपुरात आनंद देणारे दृश्य पाहण्यास मिळतात. आषाढीवारी सोहळा ३ ते १७ जुलै दरम्यान भरणार असून, जिल्ह्यात सर्वच पालखी मार्गावर बरेच टी.व्ही.चॅनेल्स, खाजगी चॅनेल्स, संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते. मात्र, ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण होऊन त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून याच्याच विचार करत अप्पर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी होणा-या आषाढी यात्रेच्या कालावधीत पंढरपुर व पालखी मार्गावर ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.