“पांडूभाऊ” भाजप सांस्कृतिक सेलची नवीन आहिराणी मालिका

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेनेच्या कलावंतांनी नुकतीच “पांडूभाऊ” ही अहिराणी मालिका (सिरीयल) तयार केली असून या मालिकेतील सर्व कलावंत तंत्रज्ञ हे सांस्कृतिक सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.

एक सामाजिक बांधिलकी जपून समाज जीवनातील विविध अडचणींवर भाष्य करणारी पांडूभाऊ ही सीरियल आहे आरोग्य प्रशासन, वैद्यकीय क्षेत्र, पोलिस विभाग, महावितरण ,कृषी क्षेत्र व समाजाच्या अनेक समस्यांवर भाष्य  करण्याचा समर्थ प्रोडक्शन व सांस्कृतिक सेल विभाग यांचा मानस आहे 

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल असे आवाहन करते की, शहरातील इतर जे कलावंत आहेत पण ज्यांना व्यासपीठ नाही. अशा कलावंतांनी आमच्या उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक सांस्कृतिक सेलचे विशाल जाधव यांच्याशी संपर्क साधावा कारण आता अजुन यापुढे या आमच्या मालिकेत अनेक मुलं-मुली महिला पुरुष यांची आवश्यकता आहे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे आमदार राजू मामा भोळे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली त्यानंतर या मालिकेचे प्रोजेक्टर द्वारे दीपक दादा सूर्यवंशी आणि सुभाषतात्या शौच्ये माजी महानगराध्यक्ष यांच्या शुभहस्ते शुभारंभाचे सादरीकरण करण्यात आले त्यानंतर ज्या कलाकारांनी व तंत्रज्ञांनी या मालिकेसाठी परिश्रम घेतले त्यांचे देखील स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पांडू भाऊ या मालिकेची निर्मिती समर्थ प्रोडक्शन ने केली या मालिकेचे निर्माता व लेखक- अमोल जाधव, दिग्दर्शक -विशाल जाधव ,डीओपी- चंद्रपाल सुरवाडे ,छायाचित्रण -पियुष पाटील ,शुभम जाधव ,रंगभूषा वेशभूषा- रोहिणी निकम,कॅलिग्राफी- विशाखा सपकाळे ,कलादिग्दर्शन- प्रेमकुमार निकुम, संकलन -चंद्रपाल सुरवाडे ,डी आय- स्टुडिओ व यात योगेश लांबोळे, भावेश पाटील, शुभम सपकाळे ,अंकुश काकडे, विशाखा सपकाळे ,सरिता तायडे ,गणेश सोनार, आणि विशाल जाधव यांनी अभिनय केला आहे. ही मालिका सर्व रसिकप्रेक्षकांना युट्युब वर पाहायला मिळेल.

सांस्कृतिक सेलच्या वतीने लोभान पाटील व प्रतिभा पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला सांस्कृतिक सेलचे महानगर संयोजक भावेश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सांस्कृतिक सेलचे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विशाल जाधव यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी रविकुमार परदेशी, श्रीकांत ढाबे, कृष्णा बारी ,तेजस कोठावदे ,सागर सदावर्ते , संजना तायडे ,दिपक कोळी ,लीना पाटील, मृणाल पाटील यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content