पाळधीतील मृत तरूणीच्या पतीचाही मृत्यू

शेअर करा !

पाळधी, ता. धरणगाव प्रतिनिधी । येथे नुकताच प्रेमविवाह केलेल्या तरूणीचा काल सकाळी संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर आता विष प्राशन केलेल्या तिच्या पतीचाही मृत्यू झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, पाळधी येथील प्रशांत विजयसिंग पाटील या तरूणाचे गावातील आरती विजय भोसले हिच्याशी प्रेम होते. यातून त्यांनी पळून जाऊन विवाह केला होता. काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते. यानंतर अचानक काल सकाळी आरतीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडला होता. तर मागील खोलीत तिचा पती प्रशांत हा देखील बेशुध्दावस्थेत आढळून आला होता.

आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळीनेच आरतीचा खून केल्याचा दावा तिच्या माहेरच्यांनी करून सिव्हीलमध्ये तिचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला होता. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर तिचे पार्थिव स्वीकारून सायंकाळी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

दरम्यान, मयत तरूणीच्या पतीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांनाच तिचा पती प्रशांत विजयसिंग पाटील याने आज सकाळी शेवटचा श्‍वास घेतला. त्याचा मृत्यू विषबाधेनेच झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. मात्र तरूणीच्या पाठोपाठ तिच्या पतीचाही मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!