पहूर प्रतिनिधी । जामनेर येथील ज्येष्ठ वकील तथा पत्रकार कृष्णा बनकर यांची कन्या आरती बनकर ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची न्यायदंडाधिकारी वर्ग-1 व दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) पूर्व मुख्य लेखी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली. याबद्दल पहूर येथील पेठ ग्रामपंचायत येथे आरती बनकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नीता पाटील ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच प्रदीप लोढा, उपसरपंच श्याम सावळे, ॲड. कृष्णा बनकर, अॅड. संजीव पाटील, रामेश्वर पाटील, शेख सलीम शेख गणी, ईका पैलवान, संदीप बेढे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, गयास तडवी, पंडित सोनार, संस्थेचे चेअरमन बाबुराव पांढरे, ग्रा.पं. सदस्य रवींद्र मोरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पांढरे, सादिक शेख, शांताराम लाठे, रवींद्र घोलप, किरण जोशी, वसीम शेख, प्रवीण कुमावत, ग्रामसेवक टेमकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
याप्रसंगी प्रदीप लोढा, शांताराम लाठे, अॅड. एस.आर.पाटील, रामेश्वर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आरती बनकर यांचा ग्रामपंचायत पहूर पेठ, कृषी पंडित मोहनलाल ग्रामीण पतसंस्था, कुमावत बेलदार समाज तसेच पहूर शहर पत्रकार संघटना आदीच्या वतीने नागरिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रामेश्वर पाटील यांनी केले तर आभार ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे यांनी मानले.