पहूर, ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हास्तरीय युवा महोत्सवात पहुर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बंजारा लोकगीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
काळाच्या ओघात लुप्त होणार्या विविध लोककला आणि लोक नृत्य तसेच संस्कृती संवर्धनासाठी दरवर्षी क्रीडा व युवक संचालनालयातर्फे युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने जळगाव येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव पार पडला.
या महोत्सवात पहुर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या लक्ष्मी विलास पवार , जोत्स्ना विष्णू चव्हाण , पुनम तुळशीराम चव्हाण , राणी चरणसिंग राठोड या विद्यार्थिनींनी बंजारा समाजाचा पारंपारिक वेश परिधान करून फगवा लोकगीत सादर केले. सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे व माता पालक धुराबाई राठोड यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले .क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, श्रीमती गुल्हन मॅडम , केंद्रप्रमुख भानुदास तायडे , महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे, मुख्याध्यापिका व्ही . व्ही . घोंगडे, उपमुख्याध्यापिका के . ए . बनकर , क्रीडा विभाग प्रमुख हरिभाऊ राऊत , एम . एच . बारी , प्रकाश जोशी यांच्यासह शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, पालकांनी या पथकाचे कौतुक केले आहे.