राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य

बारामती प्रतिनिधी । राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवण्याची सक्ती करण्यात येणार असल्याचा महत्वाचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला.

राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते. पवारांनी सत्काराला उत्तर देतांना महत्वाची घोषणा केली. याप्रसंगी ते म्हणाले की, मी, मंत्रिमंडळात लवकरच एक विषय आणणार आहे. महाराष्ट्रात ज्या ज्या शाळा असतील, ज्या उर्द असतील, इंग्रजी असतील, हिंदी असतील, मराठी असतील. ज्या भाषेतील असतील त्या भाषेतल्या, तिथं पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करणार. तुम्ही महाराष्ट्रात राहताय, माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक मुला-मुलीला मराठी लिहता, वाचता अन् बोलता आलं पाहिजे. एकदा का मराठी आलं की हिंदीही लिहिता वाचता बोलता येईल, असेही पवार यांनी सांगितले. या निर्णयामुळे उर्दु, हिंदी अन् इंग्रजी शाळांमध्येही मराठी विषय सक्तीचा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content