शेगावात श्रींचा १४४ वा प्रगटदिन उत्सावात

शेगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कोरोना साथीचा व कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना लक्षात घेऊन १७ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत ‘श्रींचा प्रकट दिन’ (१४४ वा) साजरा करण्यात येत आहे.

श्रींचा प्रगटदिनोत्सव धार्मिक प्रथा-परंपरेनुसार दरवर्षी विविध कार्यक्रमांसह लाखो भाविक भक्तांच्या व वारकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो. परंतु मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीचे संकट आणी कोविड विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी शासन निर्देशानुसार केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता यावर्षीसुध्दा ‘श्रींचा प्रगटदिनोत्सव (१४४ वा) १७ ते २३ फेब्रुवारी २०२२ पावेतो श्री संस्थानच्या धार्मिक प्रथा व परंपरेनुसार मर्यादीत स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत ई-दर्शन पासद्वारे भाविकांसाठी श्री दर्शन सुविधा उपलब्ध असून अनुषंगीक निवास व भोजनप्रसाद व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यवस्था प्रगटदिनोत्सव काळातही आहेत तशाच नियमानुसार उपलब्ध राहतील. तरी सर्व भाविक भक्त व वारकरी मंडळींनी कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री संस्थानकडून करण्यात येत आहे.

 

 

 

Protected Content