पहूर, ता. जामनेर, रविंद्र लाठे | तालुक्यातील सर्वात मोठी विविध कार्यकारी सोसायटी म्हणून ओळख असलेल्या पहूर पेठ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत भाजप प्रणीत शेतकरी पॅनलने दणदणीत विजय संपादन केला आहे.
पहूर पेठ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक रविवार, १२ जुन रोजी पार पडली. या निवडणुकीत १३ जागेसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात निवडणूक लढवित होते. यात भारतीय जनता पार्टी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना पुरस्कृत सहकार विकास पॅनल अश्या दोन पॅनल मध्ये चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखालील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने १० जागांवर दणदणीत विजय संपादन केला.
यात भाजपा प्रणीत शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे रामेश्वर बाबूराव पाटील( ३७३ ),अरुण मोतीराम घोलप( ३६९), साहेबराव बाबुराव देशमुख (३६१), अभय बळीराम पांढरे (३५६ ),राजेश पुनमचंद जैन( ३५३ ), सुशिलाबाई देवराव देशमुख (३७९ ), संध्या भारत पाटील( ३५७), किरण मगनराव खैरनार (४०९), गोकुळ दामू कुमावत (३७१ ), रविंद्र प्रल्हाद बारी ( ३८५), हे उमेदवार विजयी झाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना पुरस्कृत सहकार विकास पॅनेलचे नेतृत्व माजी जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा, भास्कर दादा पाटील आणि शिवसेना प्रवक्ते गणेश पांढरे यांनी केले. यात सहकार विकास पॅनलचे भास्कर शंकर पाटील (३७३), शामराव नामदेव सावळे (३६२), शरद बाबुराव पांढरे (३४५) हे तीन उमेदवार विजयी झाले. यामुळे पहूर विकासोवर शेतकरी विकास पॅनलचा झेंडा फडकला आहे.