पहूरच्या महावीर पब्लिक स्कुलचे एमटीएस परिक्षेत घवघवीत यश

पहूर ता जामनेर प्रतिनिधी– सन २०१९ /२० मध्ये घेण्यात आलेल्या एमटीएस महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा मध्ये पहूर येथील महावीर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

इयत्ता दुसरी तिसरी व चौथी साठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यात जामनेर सेंटर मधून महावीर पब्लिक स्कुलचे विद्यार्थी दुसरी तून श्रेयस सुनील वेदकर हा चौथ्या क्रमांकाने तिसरीतुन; भावेश ईश्वर बारी हा केंद्रातून तिसऱ्या तर चौथ्या वर्गातून श्रुती अशोक पाटील केंद्रातून दुसरी आली.

या सर्व विद्यार्थ्यांचे यांना शाळेचे मुख्याध्यापिका एस. आर कुलकर्णी,उपमुख्याध्यापक अनिता कंडारे, कविता कल्याणकर, सुषमा लोहार या सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं तसेच शाळेचे चेअरमन, प्रदिप लोढा, सचिव सचिन कैलास पाटील, सदस्य श्याम सावळे उपसरपंच पहुरपेठ, .विपीन लोढा विनोद लोढा ,दीपक लोढा, प्रफुल लोढा संचालक कृषी पंडित केंद्र यांनी सर्वांनी मुलांचे कौतुक केले आहे.

यांच्या सर्वांच्या परिश्रमामुळे आमच्या शाळेला घवघवीत यश संपादन झाले ३६ पैकी ३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले .शाळेचे सर्व स्टॉफ चव्हाण सर, अशीफ पिंजारी, नेमाडे आणि इतर सर्व शिक्षकांनी कठोर परिश्रम घेऊन शाळेला यश संपादन करून दिले .

Protected Content