पहूर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील संतोषीमातानगर येथे तीन ठिकाणी अज्ञात चोरटय़ांनी चोरी करून 28 हजार रूपये लंपास केल्याची आज पहाटे उघडकीस आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर पेठ येथील संतोषी माता नगरातील दिपक मनोहर खाटीक (वय 35 ) यांच्या रहाते घरातील खिडकीतून टोकराच्या सहाय्याने घरात लटकविलेली पॅन्ट काढून पॅन्टच्या खिशातून 20 हजार 570 रूपये तसेच त्यांच्या शेजारी राहणारे दिलीप देवचंद भोई (वय 40) यांच्या रहाते घरातील खिडकीतून टोकराच्या सहाय्याने पॅन्टच्या खिशातून 8 हजात 70 रूपये असे एकूण 28 हजार 640 रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. तसेच सकुबाई सुकदेव कुमावत (वय 45 ) यांचे वालकंपाऊंड तोडून व गेटचे कुलूप तोडून याठिकाणी ही अज्ञात चोरटय़ांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.
अद्याप गुन्हा दाखल नाही
याबाबत दिपक मनोहर खाटीक व दिलीप देवचंद भोई व संजय तोताराम बारी यांच्या तक्रारीवरून पहूर पोलीस स्टेशनला चोरी झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र संध्याकाळपर्यंत याबाबत पहूर पोलिस स्टेशन ला काहीच दाखल नव्हते.