यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दिवाळीच्या निमित्ताने पारंपारीक पद्धतीने साजरे होणारे पाडवा पहाट हे सुरेल स्वरांच्या स्वागताचे कार्यक्रम श्री व्यास मंदिरात असंख्य रसीकांच्या उपस्थित संपन्न झाले.
यावल येथील महर्षी श्री व्यास मंदिरातील सभा मंडपात आज सकाळी ६:३० वाजता संगीतमय स्वरसुरांनी पाडवा पहाटचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्रीलक्ष्मी नारायण भजनी मंडळातर्फे यशवंत सोनवणे, गणेश बडगुजर, चेतन चौधरी, नारायण वाणी, दत्तात्रय महाजन, विकास गुरव, बाळु पाटील, रविंद्र बडगुजर, श्रीवसंत वळींकार ई.नी सुरेल स्वरात भक्तिगीते सादर केलीत.
तबल्याची सादर श्रीनारायण वाणी व श्रीकृष्ण प्रसाद बडगुजर यांनी दिली. भक्तिगितांमधये रूप पहाता लोचनी, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, जाऊ दे रे मला, ऊभा कसा राहीला विटेवर, डोंगर हिरवीगार आई तुझा, देहाची ती जोडी, हे भोळयाशंकरा आवड तुला बेलाचया पानाची, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, हेची दान देगा देवा, ई.गीतांचा सुरेल मधुर आवाजात सादर करण्यात आली.
गुलाबी थंडीत वाद्याचया चालीवर रसिकांनी भरभरून दाद दिली. या स्वरांनी मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमास रसिकांमध्ये पंडीत गुरव, रमेश बोंडे, काशीनाथ बारी, मनोज येवले, दिलीप वाणी,राकेश रिक्षाचालक, ज्ञानेश्वर नाले,दगडु मंदवाडे, भुवन महाराज, बिल्लू महाराज, माधवराव व ईतरांचा समावेश होता. शेवटी भैरवी गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात येऊन श्रीलक्ष्मी नारायण भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आला. आरती मंडळातर्फे सर्वांचे आभार रमेश बोंडे यांनी मानले.