धरणगावात उद्यापासून 108 कुंडी गायत्री महायज्ञ आयोजन

dharangaon 4

 

पारोळा प्रतिनिधी । अखिल विश्व गायत्री परिवार शातीकुंज, हरिद्वार यांच्या वतीने 108 कुंडीय भव्य गायत्री महायज्ञ व संस्कार उदबोधन कार्यक्रमाचे येत्या दि. 27 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालवधीत धरणगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पारोळा येथील भक्ताचे भरीव योगदान कार्यक्रमास लाभणार असून कार्यक्रमाठिकाणी होणारे होम हवणाची व सभामंडपाची तयारी झाली आहे. उद्या दि. 27 रोजी माता भगिनींची भव्य जलकलश यात्रा दुपारी 2 ते 5 जुन्या पाण्याची टाकी येथुन सुरूवात होऊन गांधी उद्यान, कुंभारवाडा, महादेव मंदीर, डेलची, राजपूत व्यायम शाळा, जानजी बुवा, बडगुजर गल्ली, धरणी चौक, कोट बाजार, मार्गाने गायत्री शक्तिपीठ पर्यंत काढण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची रुपरेषा
भव्य मंगल कलश यात्रा स्वागत सायंकाळी 5 ते 6 वाजता संगीत, विशेष संदेश भोजन प्रसाद व शनिवार 28 रोजी सकाळी 5 ते 6 सामुहिक ध्यान साधना व योग प्राणायाम होईल. त्यानंतर 8 ते 12 देव आवाहन, गायत्री महायज्ञ, पुंसवन संस्कार, भोजन दुपारी 1 ते 2 कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय धरणगाव युवकांशी हितगुज व सायंकाळी 5 ते 7 संगीत प्रवचन, भोजन रविवार (दि.29) रोजी सकाळी 5 ते 7 सामुहिक श्राद्ध, पिंडदान, तर्पण संस्कार 8 ते 12 गायत्री महायज्ञ, भोजन प्रसाद, सायंकाळी 5 ते 7 विराट अकरा हजार वेदीय दीप महायज्ञ, भोजन प्रसाद, सोमवार (दि.30) रोजी सकाळी 5 ते 7 सामुहिक ध्यान साधना 8 ते 12 गायत्री महायज्ञ, दिक्षा संस्कार, पुर्णाहुती, विदाई व योगप्राणायाम 10 ते 12 रक्तदान शिबीर होणार असुन या कार्यक्रमास पारोळा येथील भक्तानी जमा केलेली रक्कम व धान्य, तेल डबे अध्यक्ष गणेश शिंपी, सुभाष धमके, प्रशांत येवले, योगेश बारकु मैद, माधवराव शिंपी, जितेंद्र भुरे यांनी धरणगाव येथे पोहोचविलेत तरी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे हि विनंती करण्यात आली आहे.

Protected Content