अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरण पूर्ण व्हावे यासाठी धरण संघर्ष समितीने आज जलसत्याग्रह आंदोलन केले.
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीने पाडळसरे धरणावर मोर्चा नेत भर उन्हात धरणाच्या छातीभर पाण्यात उतरून दिवसभर जलसत्याग्रह आंदोलन केले. दिर्घकाळापासून सुरू असलेल्या धरण प्रश्नावरील जनआंदोलनाकडे दुर्लक्ष करणारे जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री, पालकमंत्री व सरकारचा जोरदार धिक्कार करित निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. जल सत्याग्रहानंतरही शासनाने दखल न घेतल्यास आता जलसमाधी, आमरण उपोषण, रास्ता रोको प्रसंगी आत्मदहनासही आम्ही तयार आहोत. मात्र यामुळे शांततेच्या मार्गाने सुरू असलेले अहिंसक आंदोलन जनतेच्या हातात जाईल होणार्या परिणामास शासन जबाबदार राहिल असा निर्वाणीचा इशारा याप्रसंगी समितीने दिला आहे.
आज धरणावरच शेकडो लोकांनी महिलां,शेतकरी, युवकांसह तापी नदीच्या पाण्यात उतरून जलसत्याग्रह आंदोलन दुपारी भर उन्हात तेही छातीभर पाण्यात व कंबरेएवढ्या खोल गाळात निर्भयपणे उभे राहून केले. जिल्ह्यातील जलसंपदा मंत्री,राज्याचे महसूलमंत्री असलेले जळगाव चे पालक मंत्री यांनी आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्याने मजलसंपदा मंत्री हाय हाय! पालकमंत्री हाय हाय! लोकप्रतिनिधिंचा निषेध असो! च्या घोषणां देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.
या आंदोलनात समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी हे सौ.उषा चौधरी यांचेसह सपत्निक तर प्रा.शिवाजीराव पाटील, मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील, डी.एम.पाटील, नामदेव पाटील, अजयसिंग पाटिल, योगेश पाटिल, रणजित शिंदे, सुनिल पाटील, प्रशांत भदाणे, महेश पाटील, देविदास देसले, सुनिल पवार, रामराव पवार, पुरुषोत्तम शेटे, महिला कार्यकर्त्या सौ.प्रतिभा पाटील, सौ.पायल पाटील, सौ.सुनिता पाटील, पिंपळेच्या सौ.सुरेखा पाटील, सौ.स्वाती पाटील, संजय पुनाजी पाटील,अंतुर्ली चे शिवाजीराव पाटील, मुख्तार खाटीक, पाडळसे चे भागवत पाटील,भूषण पाटील ,विकास पाटील, रविंद्र पाटील, मंगल पाटील, शांताराम पाटील, गोपाळ कोळी,शहापूरचे भानुदास पाटील, बन्सीलाल पाटील,सुरेश पाटील, कल्याण पाटील,खेडी पोलीस पाटील सोनू पाटील, अभिमन पाटील,वासरे दादाभाऊ पाटील, आदी सहभागी झाले होते.