पाडळसरेसाठी लोकप्रतिनिधींना जाब विचारणार

अमळनेर प्रतिनिधी । पाडळसरे धरणासाठी लोकप्रतिनिधींना निवडणुकीत जाब विचारण्यात यावे असे जनआंदोलकांच्या समितीत ठरवण्यात आले.

पाडळसे धरण जनआंदोलन समितीतर्फे झालेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधिंच्या बैठकीला ६ तालुक्यातील अनेकानी दांडी मारली. तर अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, धुळे ग्रामिणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील आदींनी आंदोलक म्हणून उपस्थित दिली.धरणास निधी न देणार्‍या शासनाच्या विरोध करण्यासाठी शेतकर्‍यांनी शेतसारा व लाईटबील भरू नये, महामोर्चा न्यावा तसेच लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना जाब विचारावा ! असा विचार प्रवाह यावेळी समोर आला.

समितीचे सुभाष चौधरी यांनी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मार्गदर्शन करण्यासाठी व शासन दरबारी पुढाकार घेणेसाठी आवाहन केले.प्रा.शिवाजीराव पाटील यांनी समितीचे पत्र वाचून दाखविलें तर धरणाची आजची तांत्रिक माहिती, सद्यस्थितीतील परिस्थितीत करावयाच्या प्रयत्नांची माहिती दिली. याप्रसंगी आ.शिरीष चौधरी यांनी धरण कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणेसाठी सर्वांनी राजकिय मानपान बाजूला ठेवून एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. धरणाला पैसा न दिल्यास सरकारच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करू या. प्रचाराला येणार्‍या मंत्र्यांना समितीच्या सोबत जनतेसह निवेदन देऊ असे आवाहन करतांना येणार्‍या पावसाळी अधिवेशनात समितीला पाठीशी घेऊन मी एक आंदोलक म्हणून विधिमंडळात लढायला पुढे राहील.नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणून आंदोलकांनी पुढे निर्णय घ्यावा मी समितीच्या सोबत आहे.असे जाहिर केले.

प्रा.शरद पाटील यांनी, जळगाव जिल्ह्याच्या नेतृत्वाने धरणाचा प्रश्‍न गांभीर्याने न घेतल्याने धरण मागे पडले असल्याचा आरोप केला. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी धरणाचा इतिहास सांगितला. धरणाचा प्रश्‍न अजून समजलेला नसल्याची खंत व्यक्त करून राज्याचा जलसंपदा विभागाचा तसेच जळगांव बजेट वाढला तरी अमळनेरच्या धरणाला अतिशय कमी निधी दिल्याने अमळनेरकरांच्या तोंडाला पाने पुसली.तर भविष्यात धरणातील पाणी लिफ्ट ने उचलण्यासाठी आवश्यक असे विज प्रकल्प सध्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी पळविल्याचा आरोप ही केला.

यावेळी नामदेव पाटील, हिरामण कंखरे,अजयसिंग पाटील ,योगेश पाटील, प्रा.सुनिल पाटिल, रणजित शिंदे, चंद्रकांत साळी,प्रशांत भदाणे, हिरालाल पाटील यांनीही सहभाग घेतला.तर समितीचे एस.एम.पाटील, डी.एम.पाटील, सुनिल पवार,महेश पाटील, आर.बी.पाटील देविदास देसले, निंबा पाटील, रामराव पाटील, पुरुषोत्तम शेटे, सौ.वसुंधरा लांडगे,सुपडू बैसाने यांच्यासह सुनिल भामरे, शिवाजी पाटील, गोविंदा पाटील,मगणं शिंगाने, शालिग्राम पाटील, कुंदन खैरनार, सुहास एलमामे,परमेश्‍वर पाटील, रविंद्र पाटील,ज्ञानेश्‍वर पाटील आदिसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी यांनी शासनाचे हजारो रुपये मानधन व पेन्शन घेणारे व जनतेच्या प्रश्‍नावर लढणार्‍या आंदोलनास ज्या आजी माजी आमदार, खासदारांबद्दल यावेळी तिव्र संताप व्यक्त केला.

Add Comment

Protected Content